Posts

"सवय तुमची जात नाही"

                उभ्या जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी त्याच जीवन संपवतो,त्याला त्याच्या हक्काच देखील मिळत नाही.आणि दुसरीकडे इतरांचं जीवन संपावणारे गुन्हेगार गुन्ह्यानंतरही वर्ष वर्ष जगतात.या दोन्ही गोष्टींवर सरकार च्या भूमिकेवर केलेली टिकारूपी कविता "सवय तुमची जात नाही" नक्कीच आपल्या हृदयात ठिणगी पेटवेल.                      " सवय तुमची जात नाही " नैराश्य येऊन काळा बाप(शेतकरी) माझा झाडावरती तोडतोय दम करून देखील अपराध सुखाने जगतात नराधम. माहितेय न्याय तुमचा,तारून देखील तारणारा मरत आलाय हरसाल मारून देखील मारणारा गुन्ह्यानंतरही जगतोय सलोसाल. कर्जमाफीसाठी शेतकरी गेला संपावर,कोपर्डी प्रकारणानंतर लोक किती वेळा उतरले रस्त्यावर(मराठा क्रांती मोर्चा) पहिल्या प्रश्नाचे उत्तर मिळालं दुसऱ्याचं अजून माहित नाही,परिस्थिती टोकाला गेल्याशिवाय प्रकरण तुम्हाला सांपवायचंच नाही. येता तुम्ही घटनास्थळी,पाहून जाता सर्वकाही मात्र डोळ्यांमधल्या अश्रुंशी खेळायची सवय तुमची जात नाही. बो...